शिंदे गटातील महिलांकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंबाबत डॉक्टरांची प्रतिक्रिया म्हणाले...
ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. फेसबुक पोस्ट टाकल्याने ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिला युवतीला शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे. धक्कादायक म्हणजे ही महिला सहा महिन्याची गर्भवती असल्याची माहिती ठाकरे गटाच्या महिला युवती यांनी दिली आहे. महिलेला जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
याच पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे की, नातेवाईकांनी काल तिला रूग्णालयात दाखल केले. कोणतीही मोठी जखम आढळली नाही आहे. मुका मार लागला आहे. सोनोग्राफी केली तर अंतर्गत रक्तस्त्राव झालेला नाही. तसेच त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. युरिनल प्रेंग्नसी टेस्ट केली, ती निगेटीव्ह आली आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे.