लातूर : दीड कोटीच्या खंडणीला वैतागून डॉक्टरांची आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. याप्रकरणी डॉक्टरच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून वाढवाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे.
महेशकुमार जिवणे असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर याला वाढवणा पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. डॉ. नामदेव गिरी असे मृतकाचे नाव आहे.
लातूर येथील खेर्डामध्ये डॉ. नामदेव गिरी हे आपले सेवा बजावित होते. कोरोना काळात नामदेव गिरी यांच्यावर बनावट रेमडेसिविर इंजेक्शन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील अर्ज मागे घेण्यासाठी गिरी यांच्याकडे दीड कोटींची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. या सततच्या धमक्यांना कंटाळून नामदेव गिरी यांनी अखेर आत्महत्या केली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.