Nagpanchami 2023: नागपंचमीला करा 'हे' उपाय, सापांची भीती होईल दूर
श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पंचमीला ‘नाग पंचमी’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी नाग देवता आणि शिवशंकराची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात संततधार पाऊस कोसळतो. त्यामुळे या महिन्यात बहुतांश साप बिळातून बाहेर निघत असतात. काही साप अत्यंत विषारी असतात. त्यांच्या दंशानं व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. या अनुषंगानं आम्ही आपल्यासाठी नागपंचमीबाबत रंजक माहिती घेऊन आलो आहे. त्याचबरोबर काही उपायही सांगणार आहोत. हे उपाय केल्यानं तुम्हाला आयुष्यभर सापाची भीती वाटणार नाही. त्याचबरोबर साप तुमच्यापासून दूर पळतील.
नाग पंचमीला करा हे उपाय…
1. गायीचं शेण हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. नाग पंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुला शेणाचे नाग तयार करावे. दोन्ही नागांना कच्च्या दुधाचा नैवेद्य द्यावा.
2. नाग पंचमीला तांब्याचे नाग-नागीणची पूजा करणं शुभ मानलं जातं. या दिवशी परंपरेप्रमाणे तांब्याच्या नाग-नागीणची पूजा करून ते तिजोरीत ठेवावी.
‘सर्पापसर्प भद्रं ते गच्छ सर्प महाविष. जन्मेजयस्य यज्ञान्ते आस्तीक वचनं स्मर.. आस्तीकवचनं समृत्वा यः सर्प न निवर्तते. शतधा भिद्यते मूर्धि्न शिंशपावृक्षको यथा..’
वरील मंत्राचा नियमित जप केल्यानं घर किंवा घराच्या परिसरात साप फिरकत नाही. इतकंच नाही, चुकून तुमच्या घरात साप घुसलाच तर या मंत्राचा जप करावा. साप तत्काळ घराबाहेर निघून जातो. घराच्या परिसरात सापांचा जास्त वावर असलेल्या लोकांनी नाग पंचमीला वरील मंत्राचा जप करावा.
नाग गायत्री मंत्राचा जप करावा.
‘ओम नवकुलाय विद्यमहे विषदंताय धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात्..’