ऐन दिवाळीत रविवारी,12 नोव्हेंबर रोजी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र, रविवारी दिवाळी असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.
मध्य रेल्वे
सीएसएमटी ते विद्याविहार अप-डाऊन धिम्या मार्गावर
शनिवारी मध्यरात्री 10:55 ते पहाटे 3:55 वाजेपर्यंत
परिणाम सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकाच्या दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबणार असून, पुढे धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. तर घाटकोपरहून सुटणाऱ्या अप लोकल सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येईल आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ व भायखळा स्थानकात थांबतील.
हार्बर रेल्वे
सीएसएमटी, चुनाभट्टी / वांद्रे - स्थानकाच्या दरम्यान अप डाऊन मार्गावर
सकाळी 11:40 ते दुपारी 4:40 वाजेपर्यंत
परिणाम सीएसएमटी येथून वाशी/ बेलापूर /पनवेल / वांद्रे / गोरेगाव करिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच पनवेल / बेलापूर / वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव /वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दिवसकालीन कोणताही मेगा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.