चिपळूणमधील सर्व धर्मीय जातीय सलोखा कायम अबाधित राहू दे; जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

चिपळूणमधील सर्व धर्मीय जातीय सलोखा कायम अबाधित राहू दे; जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

सोशल मीडियामुळे जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटना घडत आहेत त्या रोखण्यासाठी प्रयत्न करावे
Published by :
Sagar Pradhan
Published on

निसार शेख|चिपळूण: बकरी ईद आणि आषाढी एकादशी यांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पोलिस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अधिपत्यखाली शांतता कमिटीची बेठक पार पडली. यावेळी धार्मिक सण शांततेत साजरा करून चिपळूणमधील सर्व धर्मीय एकोप्याची ही वज्रमूठ अशीच कायम राखावी असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, डी वाय एस पी राजेंद्र राजमाने,तहसीलदार लोकरे, प्रांत ,चिपळूण पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे आदी उपस्थितीत होते. यावेळी तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. त्यांनी कोरोना काळात आणि चिपळूण पूर यांची सर्व धर्मीय जातीय सलोखा कसा राखला जातो यांची उदाहरणे दिले. तर शिमगा सणात अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव देवीचे मानकरी असल्याचे सांगत चिपळूण ही सांस्कृतिक राजधानी असून याठिकाणी कधी ही गालबोट लागणार नाही. मात्र, आताच्या सोशल मीडियाच्या युगात कधी ही काही घडू शकते. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम बहुजन किंवा राष्ट्रीय विकास मंच स्थापन करावा अशी मागणी करण्यात आली.

तसेच जिल्हा स्तरावर शांतता कमिटीची स्पर्धा घ्यावी. त्यामध्ये चिपळूण तालुका शांतता कमिटीची पहिला क्रमांक येईल असे नागरिकांनी आवर्जून सांगितले. त्याला जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दुजोरा देत त्यावर विचार विनियम करून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. तर सोशल मीडियामुळे जातीय तेढ निर्माण होणाऱ्या घटना घडत आहेत त्या रोखण्यासाठी प्रयत्न करावे तसेच आजची युवा पिढी वाम मार्गाला जात आहे. त्याच्यावर प्रबोधन करणारी मार्गदर्शन शिबिरे घेण्यात यावीत तसेच मुंबई गोवा महामार्ग गणपतीपूर्वी कसा पूर्ण होईल आणि पावसाळ्यात परशुराम घाटात दगड माती खाली येऊन दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी उपस्थीत नागरिक यांनी केली. यावेळी अधिकारी वर्ग यांनी सर्वोतोपरी काळजी घेण्यात येईल असे आश्वासन देत आपल्या सहकार्य यांची अपेक्षा व्यक्त केली यावेळी चिपळूण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी सर्वाचे आभार मानले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com