ताज्या बातम्या
ऑगस्टमध्ये मुंबईत साथीच्या आजारांची वाढ: आरोग्य विभागाने दिली काळजी घेण्याची सूचना
मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जून जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे.
14 ऑगस्टपर्यंत मुंबईमध्ये हिवतापाचे 555 रुग्ण, डेंग्यूचे 562 आणि लेप्टोचे 172 रुग्ण सापडले असल्याची माहिती मिळत आहे. हिवताप, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
पावसाळा सुरू होताच रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.