पंकजा मुडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन चर्चाणा उधाण

पंकजा मुडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन चर्चाणा उधाण

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडत आहे. या मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
Published by :
shweta walge
Published on

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडत आहे. या मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद जाहीर केली. सरकारचं सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे असलेलं दुर्लक्ष आणि आपल्यावर, आपल्या समाजावर होत असलेला अन्याय त्यांनी बोलून दाखवल आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी ग्रामविकास मंत्री होते तेव्हा प्रत्येक गावात विकासकामं केली. प्रत्येक समाजाचा विचार करुन योजना राबवल्या. जेवढं प्रेम मी परळीवर केलं तेवढंच पाथर्डीवरही केलं. मोनिकाताईंचा मतदारसंघ हा मला माझाच मतदारसंघ वाटतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांच्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण परळीमध्ये धनंजय मुंडे यांचं वाढलेलं प्रस्थ आणि राष्ट्रवादीच्या एका गटाने भाजपसोबत केलेली सत्तासोबत बघता पंकजा मुंडे पाथर्डीमधून आगामी निवडणूक लढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी पंकजा मुंडे मतदारसंघ बदलणार, असं बोललं जात होतं. त्यामुळे त्या पाथर्डीमधून विधानसभा लढणार का? असा प्रश्न या विधानावरुन उपस्थित होत आहे.

पंकजा मुडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन चर्चाणा उधाण
Pankaja Munde : दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com