सातारा नगर पालिकेच्यावतीने शहरातून तिरंगा रॅलीचे शिस्तबद्ध आयोजन
Team Lokshahi

सातारा नगर पालिकेच्यावतीने शहरातून तिरंगा रॅलीचे शिस्तबद्ध आयोजन

सातारा नगरपरिषदेमार्फत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत गोल बाग राजवाडा ते छत्रपती शिवाजी महाराज सर्कल,पोवई नाका पर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
Published by :
shweta walge
Published on

प्रशांन्त जगताप|सातारा : सातारा नगरपरिषदेमार्फत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत गोल बाग राजवाडा ते छत्रपती शिवाजी महाराज सर्कल,पोवई नाका पर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये सातारा नगरपरिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, लेखापाल आरती नांगरे तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

राजवाडा गोलबाग येथे राष्ट्रगीत म्हणून तिरंगा रॅलीची सुरुवात करण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा उत्स्फूर्तपणे देत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी शिस्तबध्द पध्दतीने तिरंगा रॅली काढली. या तिरंगा रॅलीमध्ये नगरपरिषदेच्या वाहतुक आणि अग्निशमन विभागाकडील सर्व वाहने सहभागी झाली होती. तिरंगा रॅली पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी नागरिकांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. रॅली मध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारचे होर्डिंग्ज लावून हर घर तिरंगा अभियानाचा प्रचार करण्यात आला.

रॅलीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये सर्व नागरिकांनी आपापल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी श्री. पराग कोडगुले यांनी केले. शिवतीर्थ पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन रॅलीची सांगता करण्यात आली.

रॅलीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये सर्व नागरिकांनी आपापल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी श्री. पराग कोडगुले यांनी केले. शिवतीर्थ पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन रॅलीची सांगता करण्यात आली.

सातारा नगर पालिकेच्यावतीने शहरातून तिरंगा रॅलीचे शिस्तबद्ध आयोजन
Spicejet चं मोठं नुकसान; उड्डाणांमध्ये अडचणी, DGCA ची कारवाई अन् आता शेअर बाजारात फटका
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com