विशाल मोरे, धुळे
परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी हवालदार झाला आहे.
मुसळधार पावसामुळे धुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून धुळे तालुक्यातील देवभाने, कापडणे, धमाने यासह इतर गावांना या परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
काढणीला आलेला गहू, कापूस, हरभरा, मका इत्यादी पिके पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच कापडणे परिसरात असलेल्या फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन तात्काळ पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्याला करावी अशीच मागणी आता शेतकरी करत आहे.