धुळे पोलिसांची मोठी कारवाई; चोरी, घरफोडी दरोडे टाकणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला अटक

धुळे पोलिसांची मोठी कारवाई; चोरी, घरफोडी दरोडे टाकणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला अटक

देशी दारुच्या दुकानात असलेल्या कॅमेऱ्यामुळे पोलिसांना सापडली टोळी
Published by :
Sudhir Kakde
Published on

धुळे | उमाकांत आहिरराव : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या पिंपळनेर पोलिसांनी केली अल्पवयीन मुलांची टोळीला जेरबंद, या अल्पवयीन टोळीने पिंपळनेर पोलिसांना अक्षरशः नाकी नऊ आणून ठेवले होते. शहरात घरफोड्या मोबाइल दुकान अशा चोरांमध्ये वाढ झाली होती. त्याच बरोबर या अल्पवयीन मुलांनी देशी दारूचे देखील दुकान फोडले आणि त्यातून या चोरट्यांनी 24 हजार 290 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

देशी दारूच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये या चोरट्यांचे चित्रीकरण झाले आणि त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांनी या अल्पवयीन चोरट्यांचा शोध घेत यांना जर बंद करण्यात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंके यांनी खाकीचा धाक दाखवताच, अल्पवयीन मुलांच्या टोळीतील आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत पुण्यातील रोकड मोबाईल फोन देशी दारू आधी मुद्देमाल पोलिसांनी या टोळीकडून जप्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com