Dhule | Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे जिल्हा दौऱ्यावर | Marathi News
विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी त्यांची सभा उजळण्याचा इशारा दिला होता. शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी श्यामसनेर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, खरीप पिक विमा 2023-24 ची रक्कम मिळावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
मात्र तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा फौज फाटा लावण्यात आला. मात्र श्याम सनेर हे त्यांच्या निवासस्थानी नसल्याने सभास्थळी पोलिस तैनात करण्यात आला होता. यावेळी शाम सनेर यांच्यासह शेतकरी बांधवांनी आंदोलन करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलीस प्रशासनाने ताबडतोब या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतले, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करत असताना हे सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप शाम सनेर यांनी यावेळी केला आहे.
श्याम सनेर म्हणाले की, धुळेला देत नाहीत नंदूरबारला देतात. ही सावत्रपणाची भूमिका सरकारची निंदनीय आहे. तालूक्याचा आमदार दहशत माजवतो पोलीस बळाचा वापर करतो यासगळ्यावर निषेध केला पाहिजे.