Dhangar Reservation बाबत सर्वात मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय?
पंढरपुरात धनगर समाजाच्या उपोषणा दरम्यान एका सरपंचाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे आंदोलनाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत.देशभरात धनगर समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण मिळत आहे. मात्र, महाराष्ट्रात धनगर समाजाला सध्या एनटी संवर्गातून आरक्षण मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणी साठी पंढरपुरात धनगर समाजाकडून उपोषण करण्यात आला. या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली.
राज्य सरकारने या बैठकीत धनगर आरक्षणाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या काळात धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण होणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली.
धनगर समाज शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये काय चर्चा झाली?
"धनगर आणि धनखड हे एकच आहेत, अशा पद्धतीचा स्वतंत्र जीआर सरकारने काढावा," अशी मागणी सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने यावेळी केली. हा जीआर कशापद्धतीचा असावा, यासाठी तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची, तसेच त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आले होते, त्यापैकी पाच प्रतिनिधी यांची समिती स्थापन करुन त्यांनी हा जीआरचा मसुदा कसा असावा, याबाबत चर्चा करण्यात आली. जीआर काढला तर तो कोर्टात टीकला पाहिजे, म्हणून चार दिवसात जीआरचा ड्राफ्ट तयार करण्यात येईल. अॅडव्होकेट जनरल साहेबांचं त्यावर मत घेतले जाईल आणि पुढची सकारात्मक कार्यवाही करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते (शरद पवार गट) उत्तमराव जानकर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. "मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून काहीही निष्पन्न होणार नाही. अनेक बैठका झाल्या मात्र तोडगा निघाला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाचा विश्वासघात केला" असल्याचा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला आहे.
पंढरपुरात धनगर समाजाच्या उपोषणा दरम्यान एका सरपंचाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे आंदोलनाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत.