Pandharpur : आज पंढरपुरात धनगर समाजाचा निर्धार मेळावा

Pandharpur : आज पंढरपुरात धनगर समाजाचा निर्धार मेळावा

आज पंढरपुरात धनगर समाजाचा निर्धार मेळावा होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अभिराज उबाळे, पंढरपूर

आज पंढरपुरात धनगर समाजाचा निर्धार मेळावा होणार आहे. धनगर समाजाच्या एसटी अंमलबजावणीसाठी सलग सोळाव्या दिवशी धनगर बांधवांचे उपोषण सुरू आहे. आरक्षणाच्या मागणी आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून राज्यातील सकल धनगर समाज आज पंढरपुरात एकवटणार असल्याची माहिती मिळत आहे.

यासाठी राज्यातील सर्वपक्षीय धनगर समाजाचे नेते देखील उपस्थित राहणार असून आजच्या निर्धार मेळाव्यातून धनगर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. धनगर बांधवांनी सरकारला दिलेला आठ दिवसाचा अल्टिमेटम संपला आहे.

आजपासून धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी अधिक आक्रमक झालेला दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धनगर बांधवांच्या उपोषणाचा निर्णय देखील आजच्या धनगर मेळाव्यात होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com