भाऊ जिंकला, बहीण हरली! पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे तर भाजपचा पराभूत झाला आहे. बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, गेवराई, बीड, वडवणी, आष्टी बाजार समितीचे निकाल आले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. यामुळे बहीण हरली आणि भाऊ जिंकला अशी चर्चा या मतदारसंघात सुरू झाली आहे.
परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अद्याप मतमोजणी सुरू असून, 18 पैकी 11 जागा धनंजय मुंडे यांच्या वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने जिंकल्या आहेत, उर्वरित 7 जागी धनंजय मुंडे यांच्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, धनंजय मुंडेंनी विजय मिळवत पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला आहे.