Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज अमित शाहांची भेट घेणार

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज अमित शाहांची भेट घेणार

देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. मला सरकारमधून मोकळं करावं ही नेतृत्त्वाला विनंती आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज अमित शाहांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच राजीनामा देण्याबद्दल देवेंद्र फडणवीस ठाम असल्याची माहिती मिळत आहे.

अमित शाह यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच मुख्यमंत्री शिंदेही अमित शाहांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com