Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Team Lokshahi

Vidhansabha Elections |आचारसंहिता लागू, फडणवीस, अजित पवार, जरांगे यांच्या प्रतिक्रिया समोर

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 तारखेला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल. 23 ते 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारीसाठी अर्ज करता येणार आहे. 30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख असणार आहे. आजपासून 35 दिवसांनी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. नांदेडमध्ये पोटनिवडणूकीसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. शंखानाद असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल ! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण २० नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! २३ नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या..'अशा आशयाचं ट्टिट फडणवीसांनी केलंय.

निवडणूक जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केली आहे. सरकारची मागच्या 2 वर्षातील कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यात राष्ट्रवादीच्या प्रत्येक सहकाऱ्यानं अथक प्रयत्न केल्याचा उल्लेख दादांनी केला आहे. 'आता निर्णायक क्षण आलाय'... असं सूचक ट्विट दादांनी केलं आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी निवडणुकांची तारिख जाहीर केल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा तरूणांची आयुष्य बेचिराख करण्याचं ठरवलं असल्याची घणाघाती टीका मनोज जरांगे यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, नांदेडमधील पोटनिवडणुकीची तारिख ही जाहीर करण्यात आली आहे. याबाबत अशोक चव्हाण यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com