Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis Lokshahi

"कुणाचा कोथळा काढायचा नाही, पण..."; वाघनखांच्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना धरलं धारेवर

"स्वराज्यातही असे काही लोक होते, जे शंका उपस्थित करायचे. पण शिवाजी महाराजांनी शंकांचं निरसन करून रयतेचं राज्य प्रस्थापित करुन दाखवलं"
Published by :
Naresh Shende
Published on

Devendra Fadnavis Speech : स्वराज्यातही असे काही लोक होते, जे शंका उपस्थित करायचे. पण शिवाजी महाराजांनी शंकांचं निरसन करून रयतेचं राज्य प्रस्थापित करुन दाखवलं. मला विश्वास आहे, सुधीर भाऊंनी मुख्यमंत्र्यांचं जेव्हा स्वागत केलं, त्यावेळी त्यांनाही वाघनखं दिली आहेत. आता कुणाचा कोथळा काढायचा नाहीय. पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे. काहींच्या बुद्धीवर जंग चढला आहे. मुख्यमंत्री त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम निश्तितपणे करतील, हा मला विश्वास आहे, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन विरोधकांवर हल्लाबोल केला. ते साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या भव्य सोहळ्यात बोलत होते.

फडणवीस म्हणाले, आपल्या सर्वांसाठी आजचा क्षण अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांचा उपयोग करून स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाचा सरदार अफजल खानाचा वध केला होता. तो चित्तथरारक प्रसंग पिढ्यानपिढ्या आपण ऐकत आलो आहोत. प्रत्येक वेळी काही ना काही विवाद उभा करायचा, हाच धंदा आपल्या देशातील काही लोक करत आहेत. हा रोग आजचा नाही. या रोगाचा सामना प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना करावा लागला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्यावर चाल करून आला त्या अफजल खानाचा कोथळा काढला. ही वाघनथं इतके आल्यावर सर्वांना अभिमान आणि गौरव वाटला पाहिजे. पण काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं. चांगल्या कामाला गालबोट लावायचं असतं. वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने शिवरायांच्या शोर्याचा, पराक्रमाचा, वीरतेचा अपमना केल्यासारखा आहे. शिवभक्त कदापी हे सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांना दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com