'मतदानासाठी देवेंद्र फडणवीसांनी  मराठा समाजाला गृहीत धरूच नये' मनोज जरांगेंचा थेट इशारा

'मतदानासाठी देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला गृहीत धरूच नये' मनोज जरांगेंचा थेट इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी काल (मंगळवारी) बीड तालुक्यातील नारायण गडावर जाऊन नगद नारायण महाराजांचं दर्शन घेतलं त्यावेळी त्यांनी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आता मराठा
Published by :
shweta walge
Published on

मनोज जरांगे पाटील यांनी काल (मंगळवारी) बीड तालुक्यातील नारायण गडावर जाऊन नगद नारायण महाराजांचं दर्शन घेतलं त्यावेळी त्यांनी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आता मराठा समाजाला ग्राह्य आणि गृहीत धरू नये, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनीच दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे काही वर्षांपूर्वी नारायणगडावर एका उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमासाठी आले होते यावेळी याच नारायण गडावरून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मराठा बांधवांना दिला होता. मात्र मराठा समाजाला अद्यापही टिकणारं आरक्षण मिळालं नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मतदानासाठी आता मराठा समाजाला ग्राह्य आणि गृहीत धरू नये.

पुढे ते म्हणाले, मराठा समाजानं आता मुख्यमंत्री शिंदे आणि विरोधी पक्षावर देखील आता विश्वास टाकला असून फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, असा विश्वास आम्हाला वाटत आहे. गेल्या 75 वर्षांपासून या सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना मोठं करण्यासाठी मराठा समाजातील तरुणांनी मोठं योगदान दिलं आहे आणि आता या तरुणांसाठी काहीतरी करण्याची वेळ सरकारवर आली असताना, सरकारनं जर आरक्षण दिलं नाहीतर मराठा समाज या कुठल्याही नेत्याच्या पाठीशी उभा राहणार नाही.", असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी यावेळी बोलताना दिला आहे.

'मतदानासाठी देवेंद्र फडणवीसांनी  मराठा समाजाला गृहीत धरूच नये' मनोज जरांगेंचा थेट इशारा
...तर सरकारला ओबीसी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल; वडेट्टीवारांचा इशारा

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका, अशी मागणी ओबीसी समाजाकडून होत आहे. याबाबत बोलताना जरांगे यांनी सांगितलं की, मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे. यापूर्वीच 75 टक्के मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसीमधून आरक्षणाचा लाभ घेत आहे. यामध्ये विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा देखील समावेश आहे, त्यामुळे आता उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही हे आंदोलन उभं केलं आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही.", असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com