Badlapur Sexual Assualt: बदलापूर प्रकरणाच्या तपासासाठी SIT गठित करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

Badlapur Sexual Assualt: बदलापूर प्रकरणाच्या तपासासाठी SIT गठित करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. बदलापूर शहरातील आदर्श शाळेत 4 वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास समितीत स्थापन करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने याबाबत सोशल मीडियावर करत माहिती दिली आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Badlapur Sexual Assualt: बदलापूर प्रकरणाच्या तपासासाठी SIT गठित करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
CM Shinde on Badlapur School Case: चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरण तापलं; एकनाथ शिंदे म्हणाले...

दरम्यान, या घटनेनंतर संतापलेल्या पालकांनी आज सकाळपासून बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले. यादरम्यान, आंदोलकांकडून शाळेची तोडफोडही करण्यात आली आहे. तर रेल्वे स्थानकावर असलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com