ताज्या बातम्या
त्र्यंबकेश्वर मंदिरातील घटनेची SIT करणार चौकशी; फडणवीसांकडून गंभीर दखल
नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात काही जणांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.
नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात काही जणांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. 13 मे रोजी ही घटना घडली असून मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा रक्षकांनी वाद घालणाऱ्या जमावाला रोखले. त्यांनतर पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. मात्र त्यांनतर जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग देवस्थानने पत्र दिल्याची माहिती मिळते आहे.
याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.