मुख्यमंत्र्यांनी निधी नाही किमान वेळ द्यावा; देवेंद्र भुयार यांचा चिमटा
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आणि भाजपचे थेट तिन्ही उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीचं विजयाचं समीकरण चुकल्यामुळे महाविकास आघाडीत मोठी खळबळ माजली. त्यानंतर संजय राऊत यांनी देवेंद्र भुयार यांचं मत फुटल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता अमदार देवेंद्र भुयार यांनी आज महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका असलेले शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांचं मत हे गैसमजुतीतून निर्माण झालं असं शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र भुयार यांनी झालेल्या चर्चेची माहिती दिली. संजय राऊत यांच्या गैरसमजुतीमधून संजय राऊत यांनी व्यक्त केली. ज्यावेळेला शिवसेना राष्ट्रवादी सोबत नव्हते, त्यावेळपासून आम्ही आघाडी सोबत आहोत. तसंच आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही मतदान केलं. मात्र शिवसेनेचा उमेदवार निवडून न आल्यानं ते अपक्षांवर खापर फोडत आहेत असं भुयार यांनी म्हटलं. तसंच विधान परिषदेलाही आपण महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, देवेंद्र भुयार यांनी हे सुद्धा स्पष्ट केले की आपण या वक्तव्यामुळे व्यथित झाला होतो. ते म्हणाले, मला या आरोपामुळे झोप आली नाही, मी सकाळी उठून लगेच विमानाने शरद पवारांच्या भेटीला आलो. तसंच आपण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेणार आहे असं सांगितलं.