देशभक्तीपर देखावे आणि मंडपात सीसीटीव्ही लावण्याचे पोलिस उपायुक्तांचे निर्देश
Team Lokshahi

देशभक्तीपर देखावे आणि मंडपात सीसीटीव्ही लावण्याचे पोलिस उपायुक्तांचे निर्देश

गणेशोत्सवा दरम्यान गणेश मंडळांनी देशभक्तीपर देखावे तयार करावे. तसेच मंडळांनी मंडपात सीसीटीव्हीचा वापर करावा असे निर्देश कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व गणेश मंडळांना पोलिसांनी दिले आहे.
Published by :
shweta walge
Published on

अमझद खान | कल्याण : गणेशोत्सवा दरम्यान गणेश मंडळांनी देशभक्तीपर देखावे तयार करावे. तसेच मंडळांनी मंडपात सीसीटीव्हीचा वापर करावा असे निर्देश कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सर्व गणेश मंडळांना पोलिसांनी दिले आहे. कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी हे निर्देश शांतता कमिटीच्या बैठकी दरम्यान दिले आहेत.

येत्या 31ऑगस्ट रोजीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याण पोलिस उपायुक्त कार्यालयाच्या वतीने आज शांतता समितीच्या सदस्यांची बैठक उपायुक्त कार्यालयात पार पडली. या बैठकीस समितीचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवाचे नियोजन कशा प्रकारे करावे. विसजर्न पॉईंट कोणते असतील. विसजर्न मिरवणूकीचा मार्ग कोणता असेल याविषयी माहिती दिली गेली. त्याचबरोबर गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना कोणत्या प्रकारची आचार संहिता पाळावी याची माहिती दिली गेली. मंडळांनी सीसीटीव्ही लावावेत. गणेशोत्सव पार पडल्यावर हेच सीसीटीव्ही एक कॅमेरा देशासाठी आणि समाजासाठी या पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शेजारच्या चौकात ते कॅमेरे लावावेत असे आवाहन पोलिस उपायुक्त गुंजाळ यांनी केले आहे.

काल महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी माजी नगरसेवकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यावरील खड्डे भरण्यात येतील असे आश्वासीत केले होते. त्यांच्या बैठकीपश्चात आज पोलिस प्रशासनाकडून शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत डीसीपी सचिन गुंजाळ सह एसीपी उमेश माने पाटील, सुनील कुऱ्हाडे आणि सर्व पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय उपस्थित होते.

देशभक्तीपर देखावे आणि मंडपात सीसीटीव्ही लावण्याचे पोलिस उपायुक्तांचे निर्देश
मंत्र्यांचं बंगले वाटप जाहीर, कोण कुठं राहणार जाणून घ्या
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com