"कुणाचीही गुंडगिरी खपवून घेणार नाही", नमो महारोजगार मेळाव्यात अजित पवार कडाडले, म्हणाले...
बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोजगाराबाबत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. बेरोजगारांना रोजगार मिळालं पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. बारामतीकरांनाही विकासकामांचा अभिमान वाटेल, काम सुरु असताना बारामतीकरांनी सहकार्य केल. पोलिसांना सरकारनं ३९ वाहने उपलब्ध करुन दिली, राज्यातला नंबर वनचा तालुका म्हणजे बारामती. करायचं तर नंबर एकचं करायचं, नाहीतर त्या भानगडीत पडायचे नाही. राज्यात कुणाचीही गुंडगिरी स्विकारली जाणार नाही, असं म्हणत पवार यांनी राज्यातील वाढत्या गुंडगिरीचा समाचार घेतला आहे.
पवार मेळाव्यात म्हणाले, दोन दिवसांचा हा मेळावा आहे. अनेक वर्षे राजकारणात काम करतोय. सर्वांना नोकऱ्या मिळणं अडचणीचं जातं. नमो रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. राज्यात, देशात, परदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगार आहे. फक्त आपण त्या संघीचं सोनं केलं पाहिजे. बारामतीत झालेल्या कामाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं. रोजगार उपलब्ध आहेत फक्त संघीचं सोनं करा, असं आवाहनही पवार यांनी तरुणांना केलं आहे.
भाषणाच्या सुरुवातीला अजित पवारांनी मोठं विधान केलं. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बारामतीत आले. त्यांचं मी स्वागत करतो, असं पवार म्हणाले. नागपूरंमध्ये पहिला रोजगार मेळावा झाला. तेव्हाही उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला उशिर झाल्यानं पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री कोकणात जाऊन आल्यानं उशिर झाला. दोन दिवस नमो महारोजगार मेळावा सुरु राहणार आहे. बारामतीत झालेली विकासकामे शिंदे फडणवीसांनी स्वत: पाहावी, अशी ईच्छा होती. महाराष्ट्राचं नंबर वन बस स्थानक बारामतीत आहे. काम सुरु असतान ४० वेळा मी कामाच्या ठिकाणी भेटी दिल्या, असंही पवार म्हणाले.