Ajit Pawar: राज्याला अवकाळी पावसाचा फटका; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक

Ajit Pawar: राज्याला अवकाळी पावसाचा फटका; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक

राज्यातील गारपिटीने आणि अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली.
Published by :
shweta walge
Published on

राज्यातील गारपिटीने आणि अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची माहिती घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली. आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राज्यातील नुकसानाचा आढावा घेतला जाणार.

केंद्राकडून अवकाळी आणि गारपिटीने फटका बसलेल्या शेतीला मदत मिळवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रस्ताव पाठवण्यात येणार. राज्य सरकारकडून सध्या केंद्र सरकारकडे चाळीस दुष्काळी तालुक्यांसाठी २६०० कोटींच्या मदतीची मागणी केली आहे.

पुढील दहा दिवसात राज्यातील नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तयार करून अहवाल सादर करण्याचे सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या भागाचा अहवाल प्राप्त होताच केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार.

सध्या राज्य सरकार तातडीची मदत देण्यासंदर्भात प्रयत्नशील असल्याची विश्वसनी सूत्रांची माहिती. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार.

सध्या अनिल पाटील नाशिक मधील निफाड तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी पोहोचत आहेत. स्वतः बांधावर जाऊन पाहणी करून त्यानंतर तत्काळ मुंबईत बैठकीसाठी उपस्थित राहणार.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com