Rajendra Raut: ओबीसी मधून मराठा समाजला आरक्षण द्या अशी मागणी करतं, राजेंद्र राऊत यांच्या ठिय्या आंदोलनाला सुरुवात
बारशीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आजपासून ठिय्या आंदोलन सुरु केल आहे. विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलून या अधिवेशनामध्ये ओबीसीला बोलवून, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण का देऊ नये यासाठी त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
यावर राजेंद्र राऊत म्हणाले की, माझी मुळातचं मागणी ही आहे की, मी विधानसभा अध्यक्षांना मी पत्र दिलेलं आहे. मराठा समाजाच्या ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या विषयावर तातडीने तुम्ही अधिवेशन बोलवा. तसेच सगळ्याच आमदारांनी सगळ्या राजकीय पक्षाची ही भूमिका घेण्याची गरज आहे आणि त्यांनी ही भूमिका घ्यावी या दृष्टीकोनातून मी सगळ्याच राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना मी पत्र दिलेलं आहे. हे विशेष अधिवेशन होण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करा. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचं आहे तर हो म्हाणा, किंवा नाही द्यायचं तर नाही म्हणा. आमचा मराठा समाज राजकीय लोक जे विनाकारण वापरून घेतात त्याचा एकदा विषय मिटवा.
तसेच जरांगेंनी लावलेल्या आरोपांवर राजेंद्र राऊत म्हणाले, मी जरांगे पाटलांना काहीच बोलणार नाही. सगळ्या महाराष्ट्रामधल्या मराठा समाज बांधवाना मी सांगू इच्छितो की, मी त्यांना काही बोलणार नाही त्यांचा भूमिका काय येते त्याच्यावर माझी भूमिका असणार आहे. त्यांनी काय आरोप केले तर त्या आरोपाला उत्तर देणं माझी जबाबदारी आहे आणि माझा अधिकार देखील आहे. माझी भूमिका हीच असेल की, समाजात मी कोणत्याच प्रकारची फुट पाडू देणार नाही. जर का विशेष अधिवेशन केलं नाही तर माझी संपूर्ण मराठा समाजाला विनंती आहे की, कोणत्याच निवडणूकीला मतदान करू नका. बहिष्कार टाका.