Har Ghar Tiranga: तिरंग्याच्या मागणीत दहापटीने वाढ
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर तिरंग्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीमधील बाजारात ही मागणी तर तब्बल दहा पटीने वाढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील देशवासियांना ‘मन की बात’ च्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. दिल्लीमधील सदर बाजारात लोकांची तिरंगा खरेदीसाठी झुंबड उडत आहे. “तिरंग्याची मागणी दहापटीने वाढली आहे. इतर छपाईची कामं कऱणारेही इतर कामं सोडून फक्त तिरंग्याची छपाई करत आहेत,” अशी माहिती दुकानदाराने एएनआयशी बोलताना दिली आहे.
यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल. या अभियानाच्या अंमलबजावणीत राज्य हे देशात अव्वल राहील.