महायुतीतील जागावाटपाचा पेच कायम; दिल्लीत आज पुन्हा महायुतीची बैठक

महायुतीतील जागावाटपाचा पेच कायम पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महायुतीतील जागावाटपाचा पेच कायम पाहायला मिळत आहे. महायुतीतील जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र यावर काहीच तोडगा निघाला नाही.

याच पार्श्वभूमीवर आज महायुतीची दिल्लीत पुन्हा एकदा बैठक होणार आहे. राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांची ही बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.

तिन्ही घटकपक्षांचं नेते मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिल्लीला जाणार असल्याचे समजते. या बैठकीत जागावाटपाटा तिढा सुटणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com