Air Pollution in Delhi
Air Pollution in Delhi

Most Polluted City: दिल्ली जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर

दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलं आहे. जगातील पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्ये देशातील आठ शहरांचा समावेश आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

थंडीची चाहूल लागताच वायू प्रदूषणाची समस्या गंभीर होते. दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाने सध्या गंभीर रूप धारण केलं आहे. दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलं आहे. जगातील पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्ये देशातील आठ शहरांचा समावेश आहे.

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (२० नोव्हेंबर) दुपारी चार वाजताच्या आकडेवारीनुसार दिल्ली जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर होते. त्यामुळे दिल्लीकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

थोडक्यात

  • दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४३८ वर

  • दिल्ली जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर

  • जगातील पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्येही देशातील आठ शहरांचा समावेश

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा अतिधोकादायक पातळीवर गेली आहे. बुधवारी (२० नोव्हेंबर) दुपारी चार वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४३८ वर गेला होता. दिल्लीची गणना जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर म्हणून होत आहे. जगातील पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्येही देशातील आठ शहरांचा समावेश होता.

काय आहे कारण?

उत्तरेकडील प्रदेशांनी हवेचा गुणवत्ता निर्देशांकांची (एक्यूआय) धोकादायक पातळी नोंदवली आहे. त्यामध्ये दिल्लीतील अनेक भागातील एक्यूआय (Air Quality Index) म्हणजेच हवेचा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत धोकादायक म्हणून नोंदवला गेला आहे. सतत पडणारे धुके, वाऱ्याचा कमी झालेला वेग, कमी तापमान आणि शेजारील राज्यांमध्ये सुरू असलेल्या पेंढ्या जाळणे यासारख्या हंगामी घटकांमुळे दिल्लीत ही स्थिती उद्भवल्याचे हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने म्हटले आहे.

नागरिकांनी कशी घ्यावी काळजी?

  • नागरिकांना एन-९५ मास्क वापरण्याचं आवाहन

  • श्वसनाशी संबंधित विकार असलेल्या व्यक्तींना उच्च-गुणवत्तेचे एअर प्युरिफायर वापरण्याचा सल्ला

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com