लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळात, घरोघरी एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आज आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया!’…एक..दोन..तीन..चार…गणपतीचा जय जयकार!…असा जयघोष…ढोल-ताशांचा घुमणारा आवाज…गुलाल, फुलांची उधळण…अशा उत्साहात आज घरोघरी बाप्पाचे आगमन झाले.
आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. राज्यभरता गणरायाच्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. भाविक दर्शसाठी मोठ्या संख्येनं आल्याने रेकॉर्डब्रेक गर्दीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी दहा ते पंधरा किलोमीटरपर्य़ंत भाविकांच्या रांगा दिसून येत आहेत. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी रांगाच - रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. यंदा कोणतेही बंधन नसल्याने भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे.