दापोली येथील अपघातात मृतांची संख्या आठवर
निसार शेख, रत्नागिरी
दापोली येथे रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या लोकांची संख्या आता वाढली असून दापोलीसाठी हा रविवार काळदिवस ठरला आहे. या अपघातातील मृतांची संख्या आता आठवर पोहोचली आहे. एकूण 14 जखमी झाले त्यापैकी पाच जणांचा सुरवातीला मृत्यू झाला त्यामध्ये मॅजिक प्रवासी रिक्षा चालकाचाही समावेश आहे. या भीषण अपघातात अडखळ येथील कदम व काझी या कुटुंबातील प्रत्येकी दोन जणांचा याप्रमाणे एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कदम कुटुंबातील वडील व लेकीचा तर काझी कुटुंबातील मायलेकींचाही दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. पाजपंढरी येथील चौगुले कुटुंबामधील पत्नीचा मृत्यू झाला आहे.या भीषण अपघातामुळे तालुक्यावरती शोककाळा पसरली आहे.
सालदुरे येथे माल खाली करून भरधाव दापोलीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने हर्णै कडे जाणाऱ्या मॅजिक प्रवासी रिक्षाला भीषण धडक दिल्याने मॅजिक प्रवासी रिक्षेतील तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की मॅजिक रिक्षा एका डोंगराच्या कपारीत व गटारामध्ये अक्षरशःचेपली गेल्याने या अपघाताची भीषणता वाढली. या भीषण अपघात प्रकरणी ट्रक चालक संशयित आरोपी फैज रहीस खान (मुळ राहणार युपी ) याच्यावर दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. या दुर्दैवी भीषण अपघातात सुरुवातीला पाच जणांचा मृत्यू झाला होता तर तीन जणांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या अपघातात हर्णै बाजारपेेठ येथील प्रवासी मॅजिक चालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातातील आणखी एक महिला अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत असून तिला मुंबई येथे हलवण्यात आल आहे. या आठ जणांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. दापोली तालुक्यात राज्यमार्गावर असलेल्या आसूद जोशी आळी येथे हा भीषण अपघात झाला. रविवारी दुपारी 3.30 सुमारास अपघात झाला.
यात आठ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. मरियम गौफिक काझी-6, स्वरा संदेश कदम-8,संदेश कदम-55 ,फराह तौफिक काझी-27 सर्व राहणार अडखळ, अनिल उर्फ बॉबी सारंग ४५ रा.हर्णै (चालक) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघात रात्री उशीरा आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मिरा महेश बोरकर-22 पाडले,वंदना चोगले-38 पाजपंढरी दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला शरय्या शिरगावकर राहणार अडखळ डेरवण येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. या अपघातातील जखमींमध्ये पुढील जणांचा समावेश आहे. यातील काहीना मुंबई येथे हलविण्यात आले असून काहींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विनायक हशा चौगुले-45 पाजपंढरी,श्रध्दा संदेश कदम-14 अडखळ, ,सपना संदेश कदम-34 अडखळ,भुमी सावंत-17 हर्णे (मुंबई ट्रान्सफर), मुग्धा सावंत-14 हर्णे (मुंबई ट्रान्सफर), ज्योती चोगले-09 पाजपंढरी.
या अपघातानंतर तातडीने दापोली उपजिल्हारुग्णालयातील काही डॉक्टर व परिचारिका रविवारची सुट्टी असतानाही ही धक्कादायक बातमी कळताच रुग्णांच्या मदती करता धावून आल्या. दापोली उपजिल्हा रुण्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश भागवत, डॉ. वैष्णवी भावे, डॉ. नागेश, डॉ. प्रदिप बनसोडे, लँब टेक्निशियन श्री. गिते, एक्सरे टेक्निशियन श्री. हेमंत नाईक व श्री. मयुर पारधे, सौ. घाग (परिसेविका), सौ. जाधव (परिसेविका), सौ. हांडे, संपदा वंडकर,गायत्री भाटकर, दिपिका नांदगांवकर, अर्चना वसावे, निकिता घुगरे, आदी अधिपरिचारिका तसेच श्री. कांबळे, श्री.धोत्रे, श्री.वाघवे, श्री. चाळके, श्री. तेवरे आदी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि रामराजे नर्सिंग काँलेजचे विद्यार्थीनी जखमींवर उपचार करण्यास मदत गंभीर जखमी झालेल्यावर तातडीने उपचार सुरू केले होते. अपघात वृत्त कळताच आमदार योगेश कदम यांनीही तातडीने दापोली येथे रुग्णालयात धाव घेतली, जखमींवर मुंबई येथे नेण्यात आलेल्या गंभीर जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी तात्काळ सूचना दिल्या असून शिवसेनेचा आरोग्य विभाग सांभाळणारे मंगेश चिवटे यांनाही संपर्क करण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताच घटनास्थळी दापोली पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. या सगळ्या भीषण अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही दापोली पोलीसस्थानकात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.