Dams In Maharashtra
Maharashtra Monsoon UpdateLokshahi

राज्यात पावसाचा धुमाकूळ! राज्यातील 'हे' धरण भरले तुडुंब, खडकवासला धरणातून ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग, वाचा सविस्तर माहिती

गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे शहरात पावसाची कोसळधार सुरुच आहे. कोल्हापूर, नाशिक, मराठवाडा विभागतही पावसाची संततधार सुरुच आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Dams Overflow In Maharashtra : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे शहरात पावसाची कोसळधार सुरुच आहे. कोल्हापूर, नाशिक, मराठवाडा विभागतही पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे काही धरणांमध्ये पाण्याची पातळी ९० टक्के भरली असून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. खडकवासला धरणातून ४५ हजार क्युसेक पाणी सोडल्यानं आसपासच्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. याच पार्श्वभूमीवर या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन राज्य सरकार आणि हवामान विभागाने केलं आहे.

पुणे जिल्ह्यातील धरणांतून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग

खडकवासला - ४५००० क्यूसेक

पानशेत - १२४३२ क्यूसेक

वरसगाव - १०४८५ क्यूसेक

टेमघर - ३८१ क्यूसेक

मुळशी - २७ ३४० क्यूसेक

कासारसाई - ३४५० क्यूसेक

पवना - ७०७० क्यूसेक

वडीवळे - ८६९८ क्यूसेक

अंद्रा - ३७५२ क्यूसेक

चासकमान - ३०,१६५ क्यूसेक

कलमोडी - १५०८ क्यूसेक

भामा आसखेड - ६२०० क्यूसेक

भाटघर - २६,१३१ क्यूसेक

नीरा देवधर - ७०६० क्यूसेक

वीर - ६३,१७३ क्यूसेक

गुंजवणी - ३५९७ क्यूसेक

डिंबे - १५००० क्यूसेक

येडगाव - ७५०० क्यूसेक

वडज - ५००० क्यूसेक

बंडगार्डन (बंधारा) - ६६,७८१ क्यूसेक

दौंड (बंधारा) - ८५१२८ क्यूसेक

नाशिक शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील गंगापूर धरण ८४ टक्के भरले आहे. तर जिल्ह्यातील मुकणे धरण ५० टक्के, दारणा धरण ८८ टक्के, वालदेवी धरण ९७ टक्के, काश्यपी ४६ टक्के, गौतमी गोदावरी ८० टक्के, पालखेड ७८, वाघाड ६० टक्के भरले आहे.

धरणातून होत असलेला विसर्ग क्युसेक मध्ये

दारणा धरण : 22966

भावली धरण : 1218

कडवा धरण : 8298

भाम धरण : 4370

पालखेड धरण : 5570

नांदूर मध्यमेश्वर : 44768

गंगापूर धरण : 500

मराठवाडा विभागातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा 10.35 टक्क्यांवर पोहोचला असून सध्या जायकवाडी धरणात 4 हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा

1. राधानगरी धरण - 98.29 %

2. दूधगंगा धरण - 87.81%

3. तुळशी धरण - 3.30%

4. वारणा धरण - 85.13%

5. कुंभी - 92.96%

6. कासारी 86.48%

कडवी, पाटगाव, चिकोत्रा , चित्री, जंगम हट्टी,घटप्रभा, जांबरे , आंबेओहळ, कोदे हे सर्व प्रकल्प धरण 100 टक्के भरले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com