Dadarao Keche: बघा! आर्वीत मलाच विधानसभेची उमेदवारी मिळणार
भूपेश बारंगे |वर्धा
राज्यात दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकीचे फटाके फुटणार असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. मात्र मविआ आणि महायुती विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याचे दिसून येत आहे. राज्यातील 288 मतदारसंघात नेते कामाला लागले आहे. यातच वर्धा जिल्ह्यात चार मतदार संघ आहे. तर वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी मतदारसंघ भाजपकडे असून भाजपचे आमदार आहेत. तर देवळी मतदारसंघात काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे आहे.
सध्या आर्वी मतदारसंघात भाजप पक्षात उमेदवारीवरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेले चित्र मतदारसंघात रंगत आहे. भाजपचे आमदार दादाराव केचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मानद स्वीव सहाय्यक भाजप उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आर्वी विधानसभा क्षेत्रात आमदार दादाराव केचे आणि सुमित वानखेडे ठाण मांडून आहेत. आमदार केचे पंचायत समिती सर्कलच्या बैठका नुकत्याच झालेल्या आहेत. भापज विधानसभा क्षेत्र लक्ष बैठका घेत आहेत आणि यात सुमित वानखेडे ही लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजप पक्षात उमेदवारीवरून दोघात चढाओढ पाहायला मिळत आहे. नुकतेच काल आष्टी येथील विधानसभा क्षेत्र लक्ष मेळाव्यात आमदार केचे यांनी "मलाच उमेदवारी मिळणार आहे" असे वक्तव्य केले. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणा करत टाळ्यांचा गजर केला. दादाराव केचे आर्वी मतदारसंघातील घरापर्यंत गावापर्यंत पोहचले आहेत. ही माहिती गडकरी साहेबांपर्यंत पोहचली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत देखील माहिती आहे. सर्व्हे मध्ये दादाराव केचे 99 टक्के आहे, ते एकच टक्का आहे. असे यावेळी आमदार दादाराव केचे यांनी सांगितले.
आर्वी मतदारसंघात चढाओढीला कोण देणार विराम
जिल्ह्यात भाजपचे कमळ फुलवणारे पहिले आमदार दादाराव केचे यांच नाव समोर येते. हे आर्वी मतदार संघात दोनदा आमदार झाले आहेत. मोदींच्या लाटेत थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पुन्हा 2019 मध्ये 13 हजार पेक्षा जास्त मताने विजयी झाले. त्यानंतर 2024 मध्ये आता या मतदारसंघात भाजपचे दोन नेते उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे. आमदार दादाराव केचे यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असून कार्यकर्त्यांचे भेटीगाठी घेत आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मानद स्वीव सहाय्यक, लोकसभा निवडणुक प्रमुख सुमित वानखेडे आर्वी मतदार संघातील रहवाशी असल्याने त्यांची आमदार होण्याचे स्वप्न असल्याने ते ही उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी आर्वी मतदारसंघात मतदारसोबत बैठका घेत आहे. त्यावरून भाजप पक्षातच दोन जण उमेदवारी मागत आहे. त्यामुळे यांच्या सध्या चढाओढ सुरू आहे. यातच भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी मलाच उमेदवारी मिळणार असल्याचे भर भाषणात व्यक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. यामुळे उमेदवारी होत असलेल्या चढाओढीला कोण विराम देणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.