नाशिकमध्ये आज महिला सशक्तीकरण महाशिबिर; दादा भुसे म्हणाले...

नाशिकमध्ये आज महिला सशक्तीकरण महाशिबिर; दादा भुसे म्हणाले...

नाशिकमध्ये आज महिला सशक्तीकरण महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नाशिकमध्ये आज महिला सशक्तीकरण महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. नाशिकच्या तपोवन येथील मोदी मैदान या ठिकाणी हा महिला सशक्तिकरण मेळावा पार पडणार आहे.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा भुसे म्हणाले की, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज महिला सशक्तीकरणया संदर्भामध्ये महायुतीच्या सरकारने अनेक चांगले निर्णय घेतलं. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये प्रगतीपथावर आहे. त्याचाच एक भाग म्हणून माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजनेचं संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींना अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अशाचप्रकारचे कार्यक्रम संपन्न होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या नाशिकमध्ये हा महामेळावा आणि विशेषता महिला भगिनींचा संपन्न होतो आहे. 50 ते 75 हजार महिला भगिनींची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. असे दादा भुसे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com