ताज्या बातम्या
Cyclone Remal : रेमल चक्रीवादळाचा पश्चिम बंगालला जोरदार तडाखा
रेमल चक्रीवादळाचा पश्चिम बंगालला जोरदार तडाखा बसला आहे.
रेमल चक्रीवादळाचा पश्चिम बंगालला जोरदार तडाखा बसला आहे. किनारपट्टी भागात वादळामुळे 15 हजार घरांचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. रस्ते, रेल्वे, विमान वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. कोलकातामध्ये 24 तासांत 150 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
वादळाची तीव्रता ताशी 110 ते 120 किलोमीटर असल्याची माहिती आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक शहरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वादळामुळे बंगाल, त्रिपुरा आणि ओडिशात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
SDRF, NDRF चे जवान सज्ज झाले आहेत. रेमल चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. रेमल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.