Cyclone Dana : ओडिशात 'दाना' चक्रीवादळाचा तडाखा; 14 जिल्ह्यांमध्ये पुराचा कहर

Cyclone Dana : ओडिशात 'दाना' चक्रीवादळाचा तडाखा; 14 जिल्ह्यांमध्ये पुराचा कहर

पश्चिम बंगालवर धडकलेल्या 'दाना' चक्रीवादळामुळे हाहाकार उडाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पश्चिम बंगालवर धडकलेल्या 'दाना' चक्रीवादळामुळे हाहाकार उडाला आहे. ओडिशा राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. वादळामुळे ओडिशा हवामान प्रचंड खराब आहे.

या दाना चक्रीवादळामुळे ओडिशातील 14 जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा फटका 35.95 लाख नागरिकांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रपारा, बालासोर आणि भद्रक या ठिकाणी नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे.

याची सर्व माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारींनी दिली असून यासोबतच त्यांनी सांगितले की, आपत्तीग्रस्तांसाठी अन्न आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवल्या जात आहेत. तसेच चक्रीवादळ आणि पूरग्रस्त भागांतील घरांचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com