ताज्या बातम्या
Cyclone Dana : दाना चक्रीवादळ उद्या पहाटे पश्चिम बंगाल, ओडिसाच्या किनारपट्टीला धडकणार
अंदमान समुद्रात निर्माण झालेले दाना चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पोहोचले आहे.
अंदमान समुद्रात निर्माण झालेले दाना चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पोहोचले असून दाना चक्रीवादळ पश्चिम बंगाल, ओडिसाच्या दिशेने येत आहे. चक्रीवादळ उद्या पहाटे किनारपट्टीला धडकणार असल्याची माहिती मिळत आहे.
सकाळी हे वादळ ओडिशामध्ये पुरीच्या समुद्रकिनारी धडकू शकतं. वादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये हवामान प्रचंड खराब आहे. ओडिशात ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत.
प. बंगाल, ओडिशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून किनारपट्टी भागात NDRFची 56 पथकं तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत असून लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचं काम सुरू आहे. 100 ते 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.