Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीला धडकणार; 74000 नागरिकांचं केलं स्थलांतर
गुजरातवर बिपरजॉय वादळाचे संकट घोंगावत आहेत. बिपरजॉयमुळे गुजरातला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच, कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच आता अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनं योग्य ती खबरदारी घेतली आहे. आत्तापर्यंत 74000 नागरिकांना सरक्षीतस्थळी हलवण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.
तिन्ही सेना प्रमुखांशी बोलून बिपरजॉय चक्रीवादळाच्या संदर्भात सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेतला. लष्कर, नौदल आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) देखील मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. असे राजनाथ सिंह म्हणाले. गुजरातच्या किनारी भागातून आतापर्यंत 74 हजारांहून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना तात्पुरता निवारा छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.