Raj Thackeray
Raj ThackerayTeam Lokshahi

औरंगाबादकरांनो मेसेज शेअर करताना सावधान! राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज

सायबर सेल झाले सज्ज
Published by :
Vikrant Shinde
Published on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे ह्यांचे भाषण (Raj Thackeray Speech) व त्यानंतर ठाण्यातील जाहीर सभेतील भाषणनंतर मनसैनिक (MNS Workers) हिंदूत्तवाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

Raj Thackeray
मुंबई पोलिसांचा भोंग्यांसंदर्भात मोठा निर्णय

भोंग्यांचा मुद्दा:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मशिदींवरील भोंगे उतरवले जावे ह्याकरीता आक्रमक भुमिका स्वीकारली गेली आहे. मनसेतर्फे राज्य सरकारला 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. तर, 3 मेपर्यंत भोंगे न उतरविल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशाराही देण्यात आला आहे. औरंगाबाद हे ठिकाण मुळातच राज्यातील संवेदनशील ठिकाण म्हणून ओळखली जातं. त्यामुळे राज ठाकरे ह्यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेच्या पार्श्वभुमीवर औरंगाबाद पोलिसांच्या सायबर सेलकडून दक्षता घेण्यात आली आहे.

Raj Thackeray
MNS | Raj Thackeray | अयोध्या दौरा, भोंगा वाद, आणि आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

नेमकी काय दक्षता?

राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. त्याआधीच सायबर पोलीस सज्ज झाले आहेत. राज ठाकरेंच्या सभेआधी कुठलेही वादग्रस्त मेसेज व्हायरल होऊ नयेत, दोन समाजात वाद निर्माण होऊ नये याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलंय

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com