पुण्यात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी

पुण्यात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते आहे. 8 मतदारसंघासाठी 41 जण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

पुणे कँटोन्मेंट, शिवाजीनगर मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक असून कोथरूड मतदारसंघातून मात्र एकच उमेदवार उत्सुक असल्याची माहिती मिळत आहे.

यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत काल काँग्रेस भवन येथे इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. पुण्यातील इच्छुकांच्या मुलाखतीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे लोकसभा समन्वयक अजित दरेकर उपस्थित होते.

पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतून 41 जणांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com