'रश्मी शुक्लांवरून पटोले फडणवीसांवर बेछुट आरोप; पुरावे द्या अन्यथा...' आशिष शेलार आक्रमक
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत विरोधकांवर सडकून टीका करत नाना पटोले, उद्धव ठाकरे, शरद पवार स्थगितीचे वाहक तर आम्ही प्रगतीचे वाहक असल्याच म्हणाले. रश्मी शुक्ला यांच्यावरून नाना पटोले फडणवीसांवर बेछूट आरोप करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
काय म्हणाले आशिष शेलार?
महायुती आणि महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांची तुलना झाली पाहिजे. नाना पटोले, उद्धव ठाकरे, शरद पवार स्थगितीचे वाहक तर आम्ही प्रगतीचे वाहक असल्याच ते म्हणाले. तर आमचं सरकार पुन्हा येणार हा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये नवं सरकार आल्यावर हिंसेत वाढ झाली आहे. मविआ सत्तेत आली तर महाराष्ट्रात अशांतता अस्थैर्य हे चित्र दिसेल पण जनता त्या दिशेने जाणार नाही. याकूब मेनन, इब्राहिम मुसाचे समर्थन मविआचे लोक करतात, हे सहज होत नसून यातून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.महाविकास आघाडीला हद्दपार करा अस जनतेला त्यांनी आवाहन केल आहे.
मुंबई काँग्रेसने दिलेल्या अकरा पैकी केवळ 2 उमेदवार मराठी दिले, हा मराठी द्वेष भावनेबद्दल उद्धव ठाकरेंची भूमिका काय? काँग्रेसने मुंबईत मराठी चेहरे डावलले. काँग्रेसच्या मराठी द्वेषावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय? मराठी द्वेषाची काँग्रेसची भूमिका संयुक्त महाराष्ट्राच्या काळापासूनची. मराठी माणसाच्या छातीवर काँग्रेसने गोळ्या घातल्या आरोप त्यांनी लगावला आहे.
रश्मी शुक्ला यांची बदली
अधिकाऱ्याला समाजात टार्गेट करण्याची भूमिका उद्या काँग्रेसला भारी पडू शकते. निवडणूक आयोग निष्पक्ष आहे आता तरी मान्य करणार का ? पत्रकार पोपटलाल ते स्पॉटनाना यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये, अस म्हणत त्यांनी संजय राऊत आणि नाना पटोलेंवर टीका केली.
बेछूट आरोप करण्याआधी पुरावे द्या. पुरावे द्या अन्यथा पटोले यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. फडणवीसांचे नाव घेत असाल तर आरोप द्या अन्यथा बदनामी करण्याच्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मी निवडणूक आयोगाकडे करेल अस देखील ते म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात आरोप केला आहे की, रश्मी शुक्ला या एक वादग्रस्त अधिकारी आहेत ज्यांनी भारतीय जनता पक्षाची (भाजप) बाजू घेतली आहे आणि त्यांच्या पदावर कायम राहिल्याने निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यावर शंका निर्माण होईल.