Representative Image
Representative ImageTeam Lokshahi

गुप्तधनाच्या हव्यासापोटी आजीनेच दिला नातीचा नरबळी; 4 वर्षांनी खुनाचा उलघडा

22 जानेवारी 2019 रोजी करपेवाडी येथे पौर्णिमेला चंद्रग्रहणाच्या दिवशी हा खुन करण्यात आला होता.
Published by :
Sudhir Kakde
Published on

सातारा | प्रशांत जगताप : पाटणा तालुक्यातील करपेवाडीत 16 वर्षांच्या मुलीचा खुन झाल्याची घटना 4 वर्षांपुर्वी घडली होती. याच घटनेतील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून, गुप्तधनासाठी आजीनेच नातीचा नरबळी दिल्याचं पोलीसांकडून सांगण्यात आलं आहे. 22 जानेवारी 2019 रोजी करपेवाडी येथे पौर्णिमेला चंद्रग्रहणाच्या दिवशी हा खुन करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं असुन, या प्रकरणात सुरवातीस पोलीसांना मुलीच्या आई वडीलांवरच संशय होता.

मुलीच्या वडीलांना या प्रकरणात अटक देखील करण्यात आली होती. मात्र तपास सुरु असताना काही संशयीत पुरावे मिळाल्यानंतर पुढील तपासात हा खुन मुलीच्या आजीनेच केला असल्याचं उघड झालंय. आजीने हा खुन गुप्तधनाच्या हव्यासापोटी केल्याचं पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.

Representative Image
रुग्णवाहिकाच ठरली टोल कर्मचाऱ्यांचा काळ; थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा VIDEO VIRAL

खुन झालेल्या मुलीची आजी रंजना लक्ष्मण साळुंखे, कमला आनंद महापुरे, जादुटोना‌ करणारे होलसिंग राठोड हा वजापुर कर्नाटकचा राहणारा असुन विक्रम राठोड हा सोलापुरचा राहणार आहे. या चौघांनी मिळुनच ही हत्या केली असुन, या हत्येमागचा उद्देश हा जादुटोणा आणि गुप्तधन मिळवणे असल्याचं पोलिस अधिक्षक अजयकुमार बंन्सल यांनी सांगितलंय. या 4 ही आरोपींना अटक करण्यात आलीये मात्र कोणीही अशा जादु टोण्यावर विश्वास ठेवु नये, या सर्वातुन काहीच साध्य होत नाही उलट आपण आपलंच कुटुंब अशा प्रकारातुन गमावुन बसतो यामुळे कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवु नये असं आवाहन सुद्धा पोलिस अधिक्षक बंन्सल यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com