crime
crimeTeam Lokshahi

Crime| लग्नमंडपात घुसून नवरीचा खून

कृष्णाची नागरी मथुरामध्ये एक धक्कादायक गुन्हा घडला आहे
Published by :
Team Lokshahi
Published on

कृष्णाची नागरी मथुरामध्ये (Mathura) एक धक्कादायक गुन्हा घडला आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातल्या मुबारकपूर मध्ये गुरुवारी रात्री एका लग्न होऊ घातलेल्या नवरीची हत्या झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एका लग्न समारंभादरम्यान प्रियकराने नवरीच्या खोलीत घुसून तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुबारकपूरचे रहिवासी असणारे खुबीराम (Khubiram) यांनी आपल्या मुलीचे लग्न नोएडामधल्या ( Noida) एका तरुणाशी जुळवलं होतं. खुबीरं यांची मुलगी काजल (Kajal) हिचे गुरुवारी लग्न होणार होते. ठरल्यानुसार मोठ्या वाजत गाजत वऱ्हाड आली लग्नाचे इतर विधी पार पडले आणि काही विधी होण्यापूर्वी काजल आपल्या खोलीमध्ये येऊन बसलेली असतांना पुढच्या 'सात फेऱ्यांच्या' विधीसाठी ती तयारी करत होती आणि याचवेळी घात झाला. यावेळी एक तरुण तिच्या खोलीत आला आणि काजलवर गोळी झाडून तेथून त्या तरुणाने पळ काढला.

मृत काजलच्या डोळ्याजवळ गोळी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. भर मांडवात नवरीची अशा पद्धतीने हत्या करण्यात आल्याने लग्न समारंभासाठी आलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. लग्नाला आलेल्या वऱ्हाडींच्या म्हणण्यानुसार आरोपी तरुणाने आपल्या साथीदारांसोबत आलेल्या मुलाकडचे पाहुण्यांना धमकावल होतं.

crime
Crime | नपुंसक म्हटले म्हणून प्रियकरानेच प्रेयसीचा केला खून

आरोपी तरुण गावातलाच रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. मुलीचे वडिल खुबीराम यांनी दिलेल्या माहितीनुसार अवघे काही रीतिरिवाज बाकी होते आणि ते होण्याआधीच एक तरुण लग्नाच्या ठिकाणी येऊन आपल्या मुलीवर गोळ्या झाडून तेथून फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत.

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सुशासन आणि कडक सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यांवर योगी सरकार (Yogi government) पुन्हा एकदा सत्तेत आले पण अशाप्रकारच्या गुन्हेगारी घटना रोज घडत असल्याने नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com