मुंबई पालिकेकडून 204 कृत्रिम तलावांची निर्मिती; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई पालिकेची जागरुकता

मुंबई पालिकेकडून 204 कृत्रिम तलावांची निर्मिती; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई पालिकेची जागरुकता

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव समित्यांनी तयारी सुरू केली आहे. मुंबईत घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती असे दोन प्रकार आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव समित्यांनी तयारी सुरू केली आहे. मुंबईत घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती असे दोन प्रकार आहेत. घरगुती गणपती हे दीड दिवस, सात दिवस आणि दहा दिवसांचे आहेत. तर, सार्वजनिक गणपती दहा दिवस ते अनंत चतुर्थीपर्यंत बसतात. त्यामुळे एका बाजुला मुंबईकर लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीला लागले असून, दुसरीकडं महानगरपालिका मुंबईकरांच्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीला लागली आहे.

मुंबईत गणपती बाप्पांच्या आगमन मिरवणुका प्रसिद्ध आहेत. तसेच विसर्जन मिरवणूक देखील प्रसिद्ध आहेत. आपल्या बाप्पाला थेट पुढच्या वर्षी भेटता येणार, या भावनेतून गणपतीचं मूर्त रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी संपूर्ण मुंबई विसर्जनाच्या दिवशी रस्त्यावर उतरलेली दिसते. अशा या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाची तयारी पालिकेनं केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे.

महापालिकेनं मागील वर्षी 194 कृत्रिम तलाव विसर्जनासाठी बनवले होते. यात एकूण 76 हजारांहून अधिक गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. यावर्षी पालिकेनं गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवली असून, यंदा मुंबईत एकूण 204 कृत्रिम तलाव विसर्जनासाठी बनवण्यात आले आहेत. याशिवाय 69 नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्थाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे. पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत देखील वाढ होत असून, मागील 11 वर्षांत कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाच्या संख्येत 371 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com