Edible Oil
Edible Oil Team Lokshahi

Oil Price: खाद्यतेलाच्या किंमतीत 20 रुपायापर्यंत कपात

गृहिणींना दिलासा मिळणार आहे. कारण खाद्यतेलाच्या दरामध्ये प्रती लिटर 20 रुपयांनी कपात केली गेली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

Edible Oil Price Reduce: महागाईने त्रस्त झालेल्या सामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींमुळे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले होते. पण आता गृहिणींना दिलासा मिळणार आहे. कारण खाद्यतेलाच्या दरामध्ये प्रती लिटर 20 रुपयांनी कपात केली गेली आहे. खाद्यतेल स्वस्त झाल्यामुळे गृहिणींना आणि हॉटेल चालकांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या दरामध्ये घट झाल्यामुळे देशात देखील खाद्यतेलाचे दर कमी झाले आहे.

Edible Oil
Agnipath Scheme : अग्निपथ योजनेवरुन गदारोळ सुरु असतांना भरतीची तारीख जाहीर

देशातील खाद्यतेलाच्या प्रमुख कंपन्यांनी दरामध्ये कपात केली आहे. यात पाम तेल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलाच्या किमतींमध्ये प्रती लिटर 20 रुपयांनी कपात केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये कपात झाल्यामुळे खाद्य तेलाच्या किमती कमी झाले. दरामध्ये कपात करण्याचा निर्णय आज जाहीर केला असला तरी सुद्धा येत्या एक ते दोन आठवड्यात खाद्यतेलाच्या नवीन किमती जाहीर करण्यात येतील. खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्यामुळे गृहिणींसोबत हॉटेल चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाम तेलात कपात

पाम तेलाच्या किमतीत प्रति लिटर 7 ते 8 रुपयांची कपात करण्यात आली आहे. सूर्यफूल तेलाच्या किमतीत 10 ते 15 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर सोयाबीन तेलाच्या दरामध्ये 5 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com