cylinder
cylinder Team Lokshahi

केंद्राचा सामान्यांना झटका: दोन महिन्यात सिलेंडर 102 रुपयांनी वाढले

दोन महिन्यापुर्वी झालेल्या वाढीनंतर पुन्हा सिलेंडर 50 रुपयांनी महागले
Published by :
Team Lokshahi
Published on

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या (Domestic LPG Cylinder Price) दरात पुन्हा 50 रुपयांनी वाढ केली आहे. गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा ही वाढ झाली आहे. यामुळे दोन महिन्यात सिलेंडर 102.50 रुपयांनी वाढल्यानेसर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. (domestic cooking gas)

cylinder
नागपूरपासून मुंबईपर्यंत पाणी प्रश्न पेटला, नागपुरात काँग्रेसचे आंदोलन

पेट्रोलपासून भाज्यापर्यंत सर्वांचे दर वाढल्यांमुळे आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ केली आहे. आता घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आता प्रति सिलेंडर 999.50 रुपयांवर गेली ाहे. एलपीजी सिलेंडरची वाढलेली नवी किंमत संपूर्ण देशभरात आजपासून लागू करण्यात आली आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ

घरगुती घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 22 मार्च रोजी यापुर्वी वाढ झाली होती. प्रति सिलेंडर 50 रुपयांनी ही वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 949.50 रुपयांवर पोहोचली होती. आता पुन्हा एकदा महागाईने जनतेला मोठा झटका दिला आहे. किंमत वाढल्यामुळे घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 999.50 रुपयांवर पोहोचली आहे. तसेच १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 2355.50 रुपयांवर गेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com