शिकवणीच्या नावाखाली मुलींच्या धर्मांतराचा गोरखधंदा
गोविंद साळुके, शिर्डी; अहमदनगर जिल्ह्यातील उंबरे गावात दोन समाजात झालेल्या वादाची पार्श्वभूमी आता समोर आली आहे. अल्पवयीन मुलींना शिकवणीच्या नावाखाली एका शिक्षिकेने धर्मांतराकडे लोटण्याचा गोरखधंदा सुरू केलेला होता. मुलींना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करण्यासोबतच नकार देणाऱ्या मुलींना धमकावलं जात होतं. हिम्मत करुन एका मुलीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर आणखी दोन मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.
राहुरी तालुक्यातील उंबरे गावात दोन समाजात वाद झाल होता. आठवी नववीत शिकणाऱ्या लहान मुलींना धर्मांतराच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा धक्कादायक प्रकार सुरु होता. गावातील एक शिक्षीका कोचिंग क्लासेस चालवते. मात्र शिकवणीच्या नावाखाली अल्पवयीन हिंदू मुलींना इस्लाम कसा चांगला आहे, या धर्मात आलात तर काय फायदे आहेत? याची शिकवणी सुरू होती. धक्कादायक म्हणजे काही मुलींची मुस्लिम तरूणांसोबत ओळख करून देऊन त्यांना प्रेमाच्या जाळयात ओढण्याचाही प्रकार समोर आला आहे. विरोध केला तर फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्यांचे तोंड बंद केली जात होती. काही मुलींनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.