साईबाबांविषयी विधानावर वाद; बागेश्वर बाबांनी मागितली अखेर माफी

साईबाबांविषयी विधानावर वाद; बागेश्वर बाबांनी मागितली अखेर माफी

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असलेले बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा साईबाबांविरोधात मोठं वक्तव्य केलं होते
Published on

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असलेले बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा साईबाबांविरोधात मोठं वक्तव्य केलं होते. याचा राज्यभरातून निषेध करत टीका करण्यात आली होती. तर, अनेक ठिकाणी एफआयआर नोंदविण्याची मागणीही करण्यात आली होती. या वादानंतर अखेर धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली आहे.

साईबाबांविषयी विधानावर वाद; बागेश्वर बाबांनी मागितली अखेर माफी
आदित्य ठाकरेंनी दाढी खाजवत केली शिंदेंची नक्कल; असली माणसं पुन्हा नको

संत आणि महापुरुषांबद्दल मला नेहमीच आदर आहे. आणि असेल. मी एक म्हण सांगितली होती जी आपण आपल्या संदर्भात बोलत होतो ती म्हणजे जर आपण छत्री मागे ठेवून आपण शंकराचार्य आहोत असे म्हटले तर हे कसे होईल. शंकराचार्यांनी जे सांगितले होते, त्याचाच पुनरुच्चार आपण केला की साई बाबा हे संत फकीर असू शकतात आणि लोकांची त्यांच्यावर वैयक्तिक श्रद्धा आहे. जर कोणी संत गुरूला वैयक्तिक श्रद्धेने देव मानत असेल तर ती त्यांची वैयक्तिक श्रद्धा आहे. आमचा त्याला विरोध नाही. आमच्या कोणत्याही शब्दाने कोणाचेही मन दुखावले असेल. तर आम्ही दिलगीर व्यक्त करतो, असे धीरेंद्र शास्त्री यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री?

जबलपूर येथील पानगर येथे शनिवारी आयोजित श्रीमद भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी धीरेंद्र शास्त्री लोकांशी संवाद साधत होते. यादरम्यान, साईबाबा हे संत होऊ शकतात, ते फकीर होऊ शकतात पण ते देव होऊ शकत नाहीत. गिधाडाचं चामडं पांघरून कुणी सिंह होत नाही, असं विधान धीरेंद्र शास्त्रींनी केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com