पंजाबचे माजी खासदार सिमरनजीत सिंग मान यांचं कंगना रणौतबाबत वादग्रस्त वक्तव्य

पंजाबचे माजी खासदार सिमरनजीत सिंग मान यांचं कंगना रणौतबाबत वादग्रस्त वक्तव्य

शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी खासदार सिमरनजीत सिंग मान यांनी खासदार कंगना रणौत यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी खासदार सिमरनजीत सिंग मान यांनी खासदार कंगना रणौत यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शेतकरी आंदोलनावेळी झालेल्या बलात्कारांवरून कंगना रणौत यांनी केलेल्या विधानाला ते प्रत्युत्तर दिलं आहे.

"हा देश बलात्काराला क्षुल्लक समजणं कधीच थांबणार नाही असे दिसते. आज या ज्येष्ठ नेत्याने बलात्काराची तुलना सायकल चालवण्याशी केली. बलात्कार आणि मौजमजेसाठी महिलांवरील हिंसाचार या पुरुषप्रधान राष्ट्राच्या मानसिकतेत इतका खोलवर रुजलेला आहे की त्याचा सहज वापर केला जातो याचं आश्चर्य वाटत नाही. चित्रपट निर्माता असो वा राजकारणी असतो महिलांची टींगल केली जाते”, अशी प्रतिक्रिया कंगना रणौत यांनी दिली होती.

याच प्रकरणी सिमरनजीत सिंग मान यांनी कंगना रणौतच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. “याप्रकरणी काय बोलावं हे मला कळत नाही आहे. पण कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव आहे. तुम्ही त्यांना विचारू शकता की बलात्कार कसा होतो, जेणेकरून लोकांना समजेल की बलात्कार कसा होतो”, असं संगरूरचे माजी खासदार सिमरनजीत सिंग म्हणाले. आता रद्द करण्यात आलेल्या कृषी सुधारणा कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत भाजपा खासदाराने अलीकडे केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता सिमरनजीत मान यांनी ही टिप्पणी केली. पंजाब महिला आयोगाने या वक्तव्याची दखल घेतली असून याविरोधात कारवाई केली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com