मविआ सरकारमधील वादग्रस्त वकील अडचणीत, शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा धक्का
महाविकास आघाडी सरकारमधील वादग्रस्त सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना शिंदे- फडणवीस सरकारचा जोरदार धक्का बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्ह बॉम्बमुळे अडचणीत आले होते. तर आता प्रवीण चव्हाण पुन्हा अडचणीत आले आहेत. कारण सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकिल म्हणून बाजू मांडत असलेल्या तब्बल 19 केसेस चव्हाण यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत.
प्रविण चव्हाण हे सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकिल म्हणून बाजू मांडत असलेल्या तब्बल 19 केसेस चव्हाण यांच्याकडून काढून घेतल्या आहेत. राज्यातील डीएसके यांचा आर्थिक घोटाळा ,बहुचर्चित समृद्धी जीवन यांनी घोटाळा नागपूर येथील रवींद्र आंबेकर यांच्या संदर्भातील मोका केसेस , राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी केलेला अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा घोटाळा, अश्या अनेक महत्त्वाच्या केसेस प्रवीण चव्हाण हे न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडत होते.
प्रवीण पंडित चव्हाण हे कोण आहेत ?
प्रवीण चव्हाण हे विशेष सरकारी वकील आहेत. सुरेशदादा जैन, रमेश कदम, डीएसके, महेश मोतेवार, बीएचआर बँक, रवींद्र बराटे आदी प्रकरणात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला, त्या प्रकरणातही विशेष सरकारी वकील हेच आहेत.