भाजपाला वाटतेय ते कायम सत्तेत असतील, मात्र...; राहुल गांधी
Admin

भाजपाला वाटतेय ते कायम सत्तेत असतील, मात्र...; राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लंडन दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. दौऱ्याचा समारोप करताना छतम हाउस थिंक टँकशी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भारतात झपाट्याने काही बदल होत असून त्याचा अंदाज काँग्रेस आणि यूपीए सरकारला आला नाही. काँग्रेसने नेहमीच ग्रामीण विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. असे राहुल गांधी म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, भाजप विरोधकांचा आवाज दाबू पाहत आहेत. आपल्या मोबाइलमध्ये पेगासस या इस्रायली सॉफ्टवेअरची घुसखोरी केली गेली आहे. आरएसएस ही मूलतत्त्ववादी आणि हुकुमशाही संस्था आहे. भाजपला वाटतेय की भारतात ते कायम सत्तेत असतील; पण परिस्थिती तशी नाही. गरज पडल्यास विरोधी पक्ष एकत्र येऊन भारतातील लोकशाही संस्थांच्या सुधारण्याचे काम करतील असे राहुल गांधी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com